
उन्हाच्या झळा वाढतानाच राज्यात पुन्हा अवकाळीची चाहूल; वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊसधारा
दि.५वि.प्रजासत्ताक अमरावती
महाराष्ट्रातून आता अवकाळीनं काढता पाय घेतला असून, कमाल तापमानाच काहीशी वाढ नोंदवली जाऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. तसं झालंही. सकाळच्या वेळी राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं. पण, आता पुन्हा एकदा राज्याला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
7 ते 9 एप्रिल या दिवसांदरम्यान राज्यात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात पावसामुळं शेतपिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.
तुरळक ठिकाणी गडगडाटासह.५,६ एप्रिल:
चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची/ थंडरस्टार्म शक्यता आहे.०७ एप्रिल:अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर गडचिरोली तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची थंडरस्टार्म गडगडाटासह शक्यता.
०८ एप्रिल: अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात गडगडाट आणि विजांच्या सह हलक्या मध्यम पावसाची शक्यता. उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची/ थंडरस्टार्म शक्यता.
०९ एप्रिल:.
अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची थंडरस्टार्म शक्यता.
१० तारखेपासून कोरडे हवामान.
प्रा अनिल बंडश्री शीवाजी कृषी महाविद्यालय अमरावती