आमदार यशोमती ठाकूर यांच्या वतीने आयोजित जॉब महोत्सवाला अभुतपूर्व प्रतिसाद
70 कंपन्या आणि 4 हजार उमेदवारांना थेट नियुक्ती
आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी व आमदार यशोमती ठाकूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज 29 मे रोजी अमरावती येथे स्थानिक ज्ञानमाता शाळेत आयोजित केलेल्या जॉब महोत्सवाला संपूर्ण जिल्ह्यातून अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. 70 कंपन्यांचा सहभाग, 10 हजार उमेदवारांची नोंदणी आणि 4 हजाराच्या वर उमेदवारांना थेट नियुक्ती पत्र देण्यात आले.
*आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.*
आज 29 मे रोजी अमरावती येथील ज्ञानमाता शाळेत आयोजित केलेल्या जॉब महोत्सवाचा तिवसा मतदारसंघातील व जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवहान आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 10 हजाराच्या वर उमेदवारांनी या महोत्सवात सहभागी झाले. विशेष म्हणजे यापूर्वी 21 मे रोजी मोझरी गुरुकुंज येथे आयोजित केलेल्या जॉब महोत्सवाला सुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला होता. यावेळी सुद्धा महोत्सवात सहभागी झालेल्या 60 कंपन्यांनी 5 हजार उमेदवारांच्या मुलाखती घेवून 1600 उमेदवारांना थेट नियुक्ती पत्र दिले होते, हे विशेष.
*70 कंपन्या व 4 हजार उमेदवारांना थेट नियुक्ती*
या जॉब महोत्सवात नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील 10 वी. ते पदवीधर अशा पात्र उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. सकाळी 8.00 वा. पासूनच या उमेदवारांची नोंदणी करण्यासाठी एकच लगबग सुरु होती. ज्ञानमाता शाळेचा प्रशस्त परिसर उमेदवारांच्या उपस्थितीने व्यापून गेला होता. तर 70 कंपन्यांनी यात सहभागी नोंदवून 10 हजारापेक्षा जास्त उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शाळेच्या मैदानात उमेदवारांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे संपूर्ण मैदानात जिकडे लक्ष जाईल तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती. तर आलेल्या उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून जॉब महोत्सव आयोजकांकडून पिण्याचे पाणी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक व इतर व्यवस्था अगदी चोख करण्यात आली होती.
तसेच जॉब महोत्सवात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मदतीसाठी युवक काँग्रेस व एन.एस.यु.आय.चे 300 च्या वर पदाधिकारी कार्यरत होते, तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे स्वयंसेवक सुद्धा जातीने उपस्थित होते.
@विदर्भ प्रजासत्ताक