आमदार रवि राणा यांनी घेतला विविध कामांचा आढावा
अमरावती
आमदार रवि राणा यांच्या उपस्थितीत विविध कामांविषयी आढावा बैठक महानगरपालिकेतील कॉन्फरन्स हॉलमध्ये दिनांक २९ मे,२०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत जिल्हा नियोजन विकास समिती अंतर्गत मंजुर असलेली सर्व कामे, किती कामे मंजुर झाली व त्यापैकी किती कामे पुर्ण झाली व अपुर्ण किती, मनपा अंतर्गत प्रलंबित विकास कामे, मनपा शिर्ष विकास शुल्कसंबंधी, अमरावती शहरातंर्गत डीपी रोड व त्यावर असलेली तरतुद त्या विकास कामाबाबत, दलितवस्ती विकास निधी व कामाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. वरील सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापुर्वक करण्याचे निर्देश या बैठकीत दिले. अमरावती शहरातील शौचालय बांधकाम (महिला शौचालय) ज्या ठिकाणी कामे झाली आहे त्याचे त्वरीत लोकार्पण घेण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. अमरावती शहरातील विविध विकास कामासंबंधी बांधकाम माहिती तसेच सद्याची स्थिती बाबत माहिती जाणून घेतली. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत अमरावती शहरातंर्गत मोकाट असलेले श्वान (कुत्रे) यावर उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून श्वानांचा त्वरीत बंदोबस्त करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. बडनेरा येथील फिशरीज हब या प्रकल्पासंबंधी गती देण्यात येवून हा प्रकल्प पुर्ण करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. प्रधानमंत्री जनविकास योजने अंतर्गत अमरावती शहरातंर्गत विविध ठिकाणी प्रस्तावित केलेले विकास कामे या कामाची आजची स्थिती बाबत माहिती जाणून घेतली व त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अकोली वळण रस्ता चमणनगर संबंधी लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. अमरावती शहरातंर्गत पावसाळ्यापुर्वी नाल्याची सफाई व खोलीकरण करणे, अमरावती मनपाक्षेत्र अंतर्गत पावसाळ्यापुर्वीची व पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचुन घाण निर्माण होते अशा ठिकाणी मुरुम टाकण्यासंबंधी व गड्डे बजविणे संदर्भात त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. अमरावती शहरातील विविध योजने अंतर्गत घरकुल बांधकाम पुर्ण करण्याचे उद्दीष्ट पुर्ण करण्यात यावे यामध्ये कोणीही हयगय करु नये. छत्री तलाव व वडाळी तलाव हे प्रकल्प गतीमान करावे.
अमरावती शहराच्या विविध परिसरामध्ये रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला लागलेले होर्डींग त्वरीत काढून टाकावे. अमरावती मनपा अंतर्गत आरोग्य सुविधा दवाखाने, या दवाखान्यामध्ये मनुष्यबळ उदा.आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडीकल स्टॉप, दवाखान्यामध्ये औषध पुरवठा, यंत्र सामुग्री पुरवठा करणे बाबत या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार महोदयांनी महानगरपालिकेच्या दवाखान्यात येणारा वर्ग हा आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळे त्यांना योग्य सेवा देणे हे महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे ते पुर्ण करणे गरजेचे आहे.
या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात सविस्तर आढावा घेवून सदर योजना गतीमान करुन लाभार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. या योजने संदर्भात अडचणी येत असल्यास त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. पी.आर.कार्ड संदर्भात येणा-या अडचणी मार्गी लावण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या.
सदर कामाचा सविस्तर आढावा घेतला व सदर कामाला गती देण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. संबंधीत अधिका-यांशी समन्वय ठेवून कार्य करावे अश्या स्पष्ट सुचना संबंधीतांना दिल्या. सदर काम दिलेल्या वेळेत पुर्ण करावे अशा सुचना देण्यात आल्या. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त देविदास पवार, उपायुक्त (प्रशासन) डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त (सामान्य) जुम्मा प्यारेवाले, विशेष कार्यकारी अधिकारी (स्वच्छता/घनकचरा व्यवस्थापन) डॉ.सिमा नेताम, अधिकारी, युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@विदर्भ प्रजासत्ताक