विश्रोळी धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
२० मिनिटातच डीडीआरएफ पथकाची शोध मोहीम संपली
दि.१२विदर्भ प्रजासत्ताक
चांदूर बाजार
चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह अवघ्या २० मिनिटातच डीडीआरएफ पथकाच्या हाती आला दिनांक ११ जुन रोजी चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी धरणात शिरजगांव बंड येथील युवक शंकर माकोडे बुडाला होता या घटनेची माहिती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना मिळाली असता जिल्हाधिकारी सौरभ कटियार व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ०९ समादेशक राकेश कलासागर यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक दाखल झाले त्यानंतर तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले या पथकाने धरणाच्या जलाशयात शोधमोहीम सुरू केली असता २० मिनीटातच युवकाचा मृतदेह डीडीआरएफ पथकाच्या हाती आला
माहिती नुसार मृतक शंकर माकोडे त्याच्या सहकारी मित्रांसह धरणावर आला होता धरणात त्याने उडी टाकून पोहने सुरु केले जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे त्याला पोहने शक्य झाले नाही त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला पथकाने शंकर चा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करीता पोलिसांच्या सुपूर्त केला मृतक शंकरच्या नातेवाइकांना त्याची ओळख पटली आहे या प्रकरणी ब्राम्हणवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास राठोड यांच्या मार्गदर्शनात बिट जामादार तपास करित आहे शोध मोहीम दरम्यान डीडीआरएफ पथकामध्ये सचिन धरमकर,दीपक डोरस, दिपक पाल,विशाल निमकर, गजानन वाडेकर, दिलीप भिलावेकर, आकाश निमकर, अर्जुन सुंदरडे सह गणेश जाधव यांचा समावेश आहे.
रेस्क्यू टीम ला तात्काळ मिळाल यश!
रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले असता जागेची पाहणी केली रेस्क्यू टीम मधील गोताखोर यांनी गळ व हुक च्या साह्याने शोधकार्याला सुरुवात केली रेस्क्यू टीम मधील गोताखोर यांनी केलेल्या प्रयत्नानंतर टीमच्या हाती यश आले व शंकर चा मृतदेह हाती लागला शंकर चा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करीता पोलिसांच्या हवाली केला शोधकार्य पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
@ विदर्भ प्रजासत्ताक