अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, काय स्वस्त अन् काय महाग?; जाणून घ्या
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२३नवी दिल्ली –
एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला बजेट आज सादर होत आहे. त्यात विविध क्षेत्रांसाठी सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. परंतु सर्वसामान्य लोकांच्या खिशावर कुठला बोझा पडला आहे, कोणत्या घोषणा झाल्याने दिलासा मिळाला आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांची असते. सरकारने अनेक गोष्टींवरील कस्टम ड्युटी दर कमी केले आहेत. त्यात प्रामुख्याने कॅन्सरच्या औषधांवरील शुल्क मुक्त करण्यात आले आहे. २५ आवश्यक खनिजांवरील सीमा शुल्क हटवले आहेत.
सरकारच्या घोषणांमुळे या गोष्टी स्वस्त
सोने-चांदी खरेदी
प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटीत घट
कॅन्सरची औषधे
मोबाईल, चार्जर
चामड्यापासून बनवलेल्या वस्तू
रसायन पेट्रोकेमिकल
पीवीसी फ्लेक्स बॅनर
एक्सरे ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टर
सोलर सेल आणि पॅनेल उत्पादनाच्या वस्तू
काय महाग?
– प्लास्टिकच्या वस्तू
– पेट्रोकेमिकल – अमोनियम नायट्रेट
– पीव्हीसी –
– हवाई प्रवास
– सिगारेट
सोने-चांदीच्या दरात घट
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्यानं कॅन्सरवरील औषधं स्वस्त झाली आहेत. मोबाईल चार्जरसह अन्य उपकरणावर कर १५ टक्के घट केला आहे. त्याशिवाय सोने, चांदी यांच्यावरील कस्टम ड्युटी कमी करून ती ६ टक्के केली आहे. त्यामुळे सोने चांदी यांच्या किंमतीत घट होणार आहे. त्याशिवाय सरकारने चामड्याच्या वस्तू आणि फुटवेअरवरील कस्टम ड्युटीत घट केली आहे. तसेच सरकारने पोलाद आणि तांब्यावरील मूळ कस्टम ड्युटी कमी केली आहे.
१ कोटी युवकांना दरमहिना ५ हजार भत्ता
देशातील टॉप कंपन्यांमध्ये युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल. ज्यातून दर महिना युवकांना ५ हजार रुपये मासिक भत्ता दिला जाईल. हा मासिक भत्ता पंतप्रधान इंटर्नशिप योजनेतंर्गत १२ महिन्यांपर्यंत असेल. युवकांना १२ महिने कंपन्यात इंटर्नशिप मिळेल. पुढील ५ वर्षात देशातील टॉप कंपन्यांमध्ये १ कोटी युवकांना प्रशिक्षण दिले जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
देशातील युवकांना रोजगार-स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यास मुद्रा योजना राबवली जाते. या योजनेतून युवकांना १० लाखापर्यंत कर्ज देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज सहज आणि अल्प व्याजदारात मिळते. जर वेळेआधीच कर्जाची परतफेड केली तर कर्जावरील व्याजदरही माफ केले जाते. ज्या लोकांनी त्यांचं जुनं कर्ज फेडलं असेल अशांना आता दुप्पट कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे.