अनिल बोंडे यांच्या अमरावतीच्या घरासमोर युवक काँग्रेसच आंदोलन
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१८ अमरावती १२
भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या चा निषेध करीत कारवाई करण्याची जोरदार मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. बोंडे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे युवक काँग्रेस चे पदाधिकारी आक्रमक होत
भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या घरासमोर एकत्र येत जोरदार नारेबाजी करीत अनिल बोंडे यांच्या पोस्टरला जोडे मारलेअनिल बोंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. त्यामुळे आता भाजप विरुद्ध काँग्रेस हा वाद अमरावतीत कोणत्या स्तराला जातो या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दररोज आपल्या मोबाईलवर च वाचा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक