
चारओव्हर खेळूनही पालकमंत्री नाबाद…
आऊट करण्यासाठी पाच आमदारांना आवाहन मात्र आमदार अपयशी….
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२२अमरावती
अमरावती चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 आमदारांना आव्हान करीत होते मात्र एकही आमदार आऊट करू शकले नाही, यामुळे पालकमंत्री बावनकुळे क्रिकेट सह राजकारणात किती परिपक्व आहे याचा प्रत्यच अमरावती कराना पहायला मिळाला ,
निमित्य होत.. आमदार रवी राणा यांच्या दसरा मैदानात सुरू असलेल्या क्रिकेट टूर्नामेंटच्या उद्घाटन प्रसंगाचा ,
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आमदार रवी राणा यांनी बॅटिंग करण्याचे आव्हान केले, सुरुवातला आमदार रवी राणा यांनी बॉल टाकत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आऊट करण्याचा प्रयत्न केला मात्र रवी राणा पालकमंत्री बावनकुळे यांना आऊट करू शकले नाही ,यावेळी प्रताप दादा अडसड,प्रवीण तायडे , केवलराम काळे व डॉ.संजय कुटे यांना आमदार रवी राणा यांच्या मदतीला बॉलिंग टाकण्यास धाऊन आले मात्र पाच आमदारानी तब्बल चार ओहर टाकल्यानंतर सुद्धा पालकमंत्री बावनकुळे आऊट होऊ शकले नाही …

कोणताच आमदार मला आऊट करू शकला नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावतास मैदानातील सर्वांना हसू आलो..
यावर रवी राणा यांनी आपण आऊट झाली असते तर माझा नंबर लागला असता असं प्रत्युत्तर दिल्याने.. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व आमदारांच्या भुया उंचावल्या…




ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३