
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ४१सावा दीक्षांत समारंभ थाटात
हर्षाली हटवार अमरावती विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावत सहा सुवर्ण पदकांची मानकरी
अमरावती
महाराष्ट्रातील महान समाजसुधारकांपैकी एक, संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त आपल्यात उपस्थित राहणे हे माझे सौभाग्य आहे.मी संत गाडगे बाबांना प्रणाम करतो. ते गाव स्वच्छता आणि स्वच्छतेचे प्रणेते होते. ते एक दुर्मिळ संत होते, जे नेहमी हातात झाडू घेऊन गावकऱ्यांना उपदेश करण्यापूर्वी स्वतःच्या हातांनी गाव स्वच्छ करत असत.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 41 व्या दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व पदवीधर विद्यार्थ्यांच्या आनंदात मी सहभागी आहे.आज पदवी प्राप्त करणाऱ्या प्रत्येक पदवीधर विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांचे मी अभिनंदन करतो.1983 मध्ये स्थापनेपासून, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने उच्च शिक्षणात प्रवेश, परवडणारी क्षमता आणि उत्कृष्टतेच्या बाबतीत उल्लेखनीय प्रगती केली असल्याचे प्रतिपादन सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र आणि कुलपती यांनी आज अमरावती येथे बोलताना व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 41 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३
या दीक्षांत समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई,संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू,व्यवस्थापन, सिनेट आणि विद्वत परिषदेचे सदस्य,विद्यापीठाचे अधिकारी,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दीक्षांत समारंभांमध्ये ३८ हजार ३०५ पदवीकांक्षींना पदवी व २३८ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे.
https://youtu.be/JN_W_zo0dGo
आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. हा क्षण तुमच्या कठोर परिश्रमाचा, तुमच्या जिद्दीचा, आणि तुमच्या स्वप्नांचा विजय आहे. या पवित्र मंचावरून तुमचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होत आहे. पदवीदान समारंभ हा केवळ शैक्षणिक प्रवासाच्या समाप्तीचे प्रतीक नाही, तर नव्या जबाबदाऱ्या, संधी, आणि आव्हानांचे दार उघडतो. आज इथून पुढे तुमच्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी कसा करायचा, हा तुमचा निर्णय असेल. संत गाडगेबाबांचे विचार आणि त्यांनी समाजसेवेसाठी दिलेले योगदान तुम्हाला प्रेरणा देणारे ठरू शकतात.असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले
आज गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना १२२ सुवर्ण पदके, २२ रौप्य पदकांसह २४ रोख पारितोषिक असे एकूण १६८ पारितोषिकांचे वितरण सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र आणि कुलपती यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्येही मुलींनीच बाजी मारली आहे. हर्षाली हटवार हिने या वर्षी अमरावती विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावत सहा सुवर्ण पदकांची मानकरी ठरली आहे.या दीक्षांत समारंभाचे स्वागतपर भाषण व प्रास्ताविक कुलगुरू मिलिंद बारहाते यांनी केले.