….पण मी शेतकऱ्यांसाठी बोलेल अजून पडलो तरी त्याची परवा नाही:- बच्चू कडू
छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातली वतनदारी बंद केली व शेतकऱ्याच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही, 50% नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असं भाजपने म्हटलं होतं, व काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू असं म्हटलं होतं मात्र मात्र काँग्रेसने सुद्धा ते लागू केलं नाही पार्टी कोणतीही असली तरी ते शेतकऱ्यांच्या हितासाठी राहत नाही हे 75 वर्षात पाहिलं, *मी हे शेतकरी म्हणून बोलत आहे राग आला तरी चालेल, बच्चू कडू याची पर्वा करत नाही,ही लाचारी जर करता आली असती तर कोणाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं पण ती लाचारी आमच्यात नाही.असे वक्तव्य अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंती निमित्त च्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी केले.
https://youtu.be/lJjs-7shBm4




ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३