
चटके दिलेल्या ‘त्या’ बाळाला पुढील उपचारासाठी नागपूर रेफर…
तर बाळाच्या आईवर गुन्हा दाखल
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२७अमरावती
भोंदु तांत्रिकाचा सल्ला ऐकूण एका २२ दिवसाच्या हृदयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या आजारी बाळाच्या पोटाला ६५ चटके दिल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत चिखलदरा पोलिसांचे पथक बुधवार २६ फेब्रुवारी रोजी हातरू प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अख्यारित येणाऱ्या सिमोरी गावात दाखल झाले आहे.तर मुलाला पुढील उपचारासाठी नागपूर रवाना करण्यात आले.
पोलिसांनी गावात पोहचताच आरोग्य यंत्रणेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी, ग्रामसवेक, ग्राम सचिव, आशा वर्कस, सरपंचसह गावातील काही महिला, पुरूषांसोबत पोलिसांनी विचारपूस केली. या तपासात मुलाच्या आईनेच बाळाला गरम सळईने चटके दिल्याचे निष्पन्न झाल्याने बाळाच्या आईविरुद्ध वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे बाळाला इन्फेक्शन झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास .पोलीस बंदोबस्तात नागपूरला पाठविण्यात आले




ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३